रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्जनुसार बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये आलेल्या. 1.22 टक्क्यांच्या तेजीमुळे अंबानींची रिअल टाइम नेटवर्थ 2.73 लाख कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत पहिल्या क्रमांकावर राहिलेले चीनचे हुइ का-यान 2.63 लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थसह दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. फोर्ब्जच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी 14 व्या क्रमांकावर आहेत.रिलायन्स इंडस्ट्रीजदेखील सहा लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप असलेली देशातील पहिली कंपनी बनली आहे..धीरूभाई अंबानी ने रिलायन्स कंपनी चा प्रारंभ केला होता त्यांचे दोन्ही पुत्र मुकेश आणि अनिल यांनी ह्या व्यवसायाला नवीन उंची वर नेले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews